The snake stuck to the rat glue applied to catch the rat, the flying trio of staff

उदंराला पकडण्यासाठी ठेवलेल्या ग्लू स्टिक पॅडवर साप चिकटल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाची चांगलीच भांबेरी उडाली होती. सकाळी सुरक्षा रक्षक उंदिर चिकटला आहे का पाहायला गेला तर त्याला सापच चिकटला असल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई : मुलुंडमधील एक कंपनीतील लिफ्टमध्ये उंदरांनी उच्छाद मांडला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उदराला पकडण्यासाठी लिफ्टमध्ये रॅट ग्लू स्टिक पॅड ठेवला होता. परंतु या रॅट ग्लू पॅडवर सापच चिकटला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता.

उदंराला पकडण्यासाठी ठेवलेल्या ग्लू स्टिक पॅडवर साप चिकटल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाची चांगलीच भांबेरी उडाली होती. सकाळी सुरक्षा रक्षक उंदिर चिकटला आहे का पाहायला गेला तर त्याला सापच चिकटला असल्याचे पाहायला मिळाले. कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सदर माहिती प्राणीमित्रांना दिली. प्राणीमित्र तात्काळ दाखल झाले. यानंतर हा साप ३ फूटांचा असून बिनविषारी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राणीमित्रांच्या सहाय्याने या सापाला सोडवून वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले असून सापावर उपचार सुरु आहेत. परंतु लिफ्टमध्ये हा साप कसा आला हे अद्याप कळाले नाही. कंपनीच्या परिसरात उंदरांनी उच्छाद मांडल्यामुळे त्यांना पकडण्यासाठी रॅट ग्लू पॅड लावण्यात आले होते. परंतु यामध्ये सापच सापडला असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता.