Thackeray government's pressure increased; What will the governor decide in the name of the 12 MLAs recommended by the government?

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यापासून अन्य अनेक मुद्यावर असलेल्या मतभेदांच्या बाबीवर वादळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदार सरनाईक यांच्या पत्रावरून निर्माण झालेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न दैनिक सामनामध्ये भुमिका मांडून करण्यात आला तरी मागील काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवूनच घेतले आहे, आणि त्यांच्याशी कधीच वैर नव्हते असा उल्लेख करण्यात आल्याने आघाडीत नवे वादंग सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सा-या मुद्यांवर समन्वय समिती मध्ये चर्चा झाल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबई :  राज्य विधिमंडळाचे अधिवेशन, मराठा आरक्षण, या सह इतर मागासवर्गाच्या रद्द झालेल्या आरक्षणाच्या मुद्यावर राज्य निवडणुक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका  जाहीर केल्याने महाविकास आघाडी सरकार मधील गोंधळ वाढला आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर आज तीनही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक झाली.

    आघाडीत नवे वादंग सुरू

    त्यात पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यापासून अन्य अनेक मुद्यावर असलेल्या मतभेदांच्या बाबीवर वादळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदार सरनाईक यांच्या पत्रावरून निर्माण झालेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न दैनिक सामनामध्ये भुमिका मांडून करण्यात आला तरी मागील काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवूनच घेतले आहे, आणि त्यांच्याशी कधीच वैर नव्हते असा उल्लेख करण्यात आल्याने आघाडीत नवे वादंग सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सा-या मुद्यांवर समन्वय समिती मध्ये चर्चा झाल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

    अडीच वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देण्याचा मुद्दा

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या मुद्यावर पृथ्वीराज चव्हाणांपासून ते सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंतच्या सर्वच नेत्यांनी पटोले यांच्या सुरात सूर मिसळला होता. तर अडीच वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देण्याचा मुद्दा उपस्थित केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी कुणाची लाचारी करत पालख्या उचलणार नसल्याचे वर्धापनदिनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारला अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर राष्ट्रवादी या स्थितीत मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरत असल्याची धारणा शिवसेनेची झाली आहे.

    इतर मागासवर्गीयाच्या असंतोषाला सामोरे जावे लागणार

    भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असे पटोले यांनी म्हटल्याने इतरमागासवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने जाहीर झालेल्या ३३स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत येत् महिन्यात आघाडी समोर पेच निर्माण झाला आहे. या जागा सर्वसाधारण प्रवर्गात उमेदवार देवून लढवताना इतर मागासवर्गीयाचा असंतोषाला सरकारमधील पक्षांना सामोरे जावे लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्याने अधिवेशन जास्त दिवस न चालविता थोडक्यात घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यावरूनही विरोधकांनी रान पेटविण्यास सुरूवात केली आहे.