महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी नियंत्रणात पण…

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी नियंत्रणात आहे. पण, थर्टी फस्ट आणि नववर्ष जल्लोषाच्या निमित्ताने गर्दी वाढल्यास परिस्थिती बिघडू शकते. यामुळे कोरोना परिस्थिती लक्षात घेता खबरदारी घेता नियमांचे पालन करने गरजेचे आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी नियंत्रणात आहे. पण, थर्टी फस्ट आणि नववर्ष जल्लोषाच्या निमित्ताने गर्दी वाढल्यास परिस्थिती बिघडू शकते. यामुळे कोरोना परिस्थिती लक्षात घेता खबरदारी घेता नियमांचे पालन करने गरजेचे आहे.

राज्यात साेमवारी २,४९८ नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. तर, ५० काेराेना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७% एवढा आहे.

साेमवारी राज्यात ४,५०१ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १८,१४,४४९ काेराेना बाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९४.४ % एवढे झाले आहे. आता राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,२२,०४८ झाली आहे. राज्यात आज एकूण ५७,१५९ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात ५० बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूपैकी २२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

हे २३ मृत्यू औरंगाबाद -७, ठाणे-४, नािशक-२, गोंदिया-२, बीड-१, भंडारा-१,गडचिराेली-१, पालघर-१, जालना-१, रायगड-१, परभणी-१ पुणे-१ असे आहेत.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,४३,७७२ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १९,२२,०४८ (१५.३२ टक्के)नमुने पाॅिझटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४, ५२,५३५ व्यक्ती हाेमक्वारंटाईन असून ३,१३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.