ठाकरे सरकारनं ना नियुक्त्या दिल्या, ना पदभरत्या केल्या – पडळकर

आरोग्य विभागातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यामुळं प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. हे काय फक्त  एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेता का?  स्वत:ची मुलं, नातू, आमदार खासदार होण्यापुरतं फक्त प्रस्थापितांकडं रिक्तपदे असतात. पण बहुजन समाजातील मुलांनी मात्र यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे..

    मुंबई : ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गमवावा लागला होता, त्यांनतरही या प्रस्थापितांच्या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरत्या केल्या. आता तर यांनी वेगवेगळ्या वीस विभागातील ११,३५१ पद रिक्त असताना मात्र लोकसेवा आयोगाकडं फक्त आणि फक्त ४,२६४ रिक्त पदांच्या पदभरतीची मागणी केली. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वच श्रेणीतील पद २५०० च्या आसपास पद रिक्त असताना अमित देशमुखांच्या खात्यानं लोकसेवी आयोगाला काहीच मागणी केली नाही.. हीच बोंब अनके खात्यांची आहे.

    आरोग्य विभागातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यामुळं प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. हे काय फक्त  एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेता का?  स्वत:ची मुलं, नातू, आमदार खासदार होण्यापुरतं फक्त प्रस्थापितांकडं रिक्तपदे असतात. पण बहुजन समाजातील मुलांनी मात्र यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे..

    आता आरोग्य विभागातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्यामुळे या सरकारचा गोंधळ आणि अपयश समोर येत आहे, अशी बोचरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.