सर्व व्यवहार बंद! कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीयंटचा प्रसार रोखण्यासाठी एककदम कडक निर्बंध

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्य आणिबाणीची शक्यता लक्षात घेत राज्य सरकारकडून नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.

  मुंबई : राज्य सरकारने डेल्टा प्लस व्हेरीयंट या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आधीच्या नियमावलीमध्ये नवीन बदल करणारे आदेश निर्गमीत केले आहेत. त्यामुळे सोमवार पासून राज्यात सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांच्या क्षेत्रात तिसऱ्या गटातील निर्बंध लागू केले जाणार आहेत.

  वाढती गर्दी आणि नव्या व्हेरियंटचा धोका

  ब्रेक द चेन अनलॉक अंतर्गत गेल्या चार आठवड्यात पाच टप्यात  कोरोनाची रुग्ण आकडेवारी आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडच्या प्रमाणानुसार त्या त्या भागातील स्थानिक प्रशासनाला अनलॉक करण्याच्या पातळीनुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली होती त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्हयात ब-यापैकी सूट देण्यात आली होती. मात्र त्या नंतर वाढत्या गर्दीमुळे तसेच कोरोनाचा नवा प्रकारचा विषाणू आढळून येत असल्याने विषाणूचा दुस-या लाटे मध्ये जसा प्रसार झाला तसा होवू नये यासाठी सरकारने वेळीच निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते.

  सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु

  राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्य आणिबाणीची शक्यता लक्षात घेत राज्य सरकारकडून नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.

  त्यामुळे सोमवारपासून महापालिका क्षेत्रात तसेच जिल्ह्यामधील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.