दोन-चार आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार; रुग्णसंख्या ४ लाखांपर्यंत जाणार? टास्कफोर्सचा इशारा

पुढील २-४ आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता अजून पूर्णत: कमी झाली नसतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिला आहे.  महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे.

  मुंबई : पुढील २-४ आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता अजून पूर्णत: कमी झाली नसतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिला आहे.  महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे.

  संसर्गाचा हाच पॅटर्न दुसऱ्या कोरोना लाटेत

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सादर केली. यावेळी त्यांनी तिसऱ्या कोरोना लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आधीपेक्षा दुप्पट म्हणजे ८ लाखांपर्यंत जाण्याचा धोका असल्याचे सांगितले. यात १० टक्के रुग्ण लहान मुले आणि तरुण असतील असेही नमूद करण्यात आलेय. संसर्गाचा हाच पॅटर्न दुसऱ्या कोरोना लाटेत देखील पाहायला मिळाला होता.

  दोन लाटांमध्ये शंभर दिवस किंवा ८ आठवड्यांचे अंतर

  कोरोना नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज सांगताना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी अशी परिस्थिती याआधी ब्रिटनमध्ये दिसल्याचे सांगितले. ब्रिटनमध्ये देखील दुसऱ्या लाटेनंतर केवळ ४ आठवड्यात तिसऱ्या लाटेचा संसर्ग पाहायला मिळाला. सामान्यपणे कोरोनाच्या दोन लाटांमध्ये शंभर दिवस किंवा ८ आठवड्यांचे अंतर असल्याचे साथीरोग तज्ज्ञांचे मत आहे. हे अंतर पहिल्या लाटेचा शेवट ते पुढील लाटेचा उच्चांक असे आहे.

  गर्दी आणि शाररिक अंतराचा फज्जा

  महाराष्ट्रात दुसरी कोरोना लाटेची तीव्रता कमी झाल्याने अनेक ठिकाणी निर्बंध हटवण्यात आले. त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी आणि शाररिक अंतराचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यातच आता टास्कफोर्सने हा गंभीर इशारा दिल्याने आरोग्य यंत्रणेच्या काळजीत वाढ झाली आहे.

  हे सुद्धा वाचा