डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती

राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे संकेत दिले आहेत(The third wave of corona will hit Maharashtra in December; Health Minister Rajesh Tope gave important information). तिसरी लाट यील मात्र ती दुसऱ्या लाटेसारखी भयावह नसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

    मुंबई : राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे संकेत दिले आहेत(The third wave of corona will hit Maharashtra in December; Health Minister Rajesh Tope gave important information). तिसरी लाट यील मात्र ती दुसऱ्या लाटेसारखी भयावह नसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

    राज्यात लसीकरणाचा वेग चांगला असल्याने तिसऱ्या लाटेचा फारसा परिणाम जामवणार नाही, असे राजेश टोपे यांचे म्हणणे आहे. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि आसीयू बेडची आवश्यकता पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

    कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर २०२० मध्ये आली होती, त्यानंतर दुसरी लाट एप्रिल २०२१ मध्ये आली होती, त्यानंतर आता लाटेच्या गतीने तिसरी लाट डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता तज्ज्ञही व्यक्त करीत आहेत.

    राज्यात ८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण

    सध्या राज्यातील ८० टक्के लोकांना एक तरी लस देण्यात आली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना संक्रमणातील मृत्यू रोखण्यासात लसीकरणाची महत्त्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या राज्यात कोरोना संक्रमणाचा दरही मंदावलेला असून मृत्यूदर शून्याजवळ आहे.

    राज्यात गेल्या तीन दिवसांत सक्रिय कोरोना रुग्ण १० हजारांहून कमी आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ७६६ नवे रुग्ण सापडले असून, १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.