ट्विट कोणावर व्यक्तिगत केलं नव्हतं, पूनम महाजन सध्या काय करताहेत? संजय राऊत यांचा सवाल

“कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट” अशी कॅप्शन देत एक कार्टून शेअर केलं होतं. या कार्टूनमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसल्याचं दिसून येत होतं. यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे पाय समोरील खुर्चीवर असून समोर उभ्या प्रमोद महाजन यांना ‘हॅव अ सीट’ असं म्हणत आहेत. यावेळी खुर्चीच्या बाजूला एक छोटा स्टूल देखील होता. नंतर हे ट्वीट संजय राऊत यांनी डिलीट केलं. यानंतर पूनम महाजन यांनी नामर्दासारखे कार्टून दाखवू नका, अशी राऊत यांच्यावर टिका केली होती.

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट” अशी कॅप्शन देत एक कार्टून शेअर केलं होतं. या कार्टूनमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसल्याचं दिसून येत होतं. यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे पाय समोरील खुर्चीवर असून समोर उभ्या प्रमोद महाजन यांना ‘हॅव अ सीट’ असं म्हणत आहेत. यावेळी खुर्चीच्या बाजूला एक छोटा स्टूल देखील होता. नंतर हे ट्वीट संजय राऊत यांनी डिलीट केलं. यानंतर पूनम महाजन यांनी नामर्दासारखे कार्टून दाखवू नका, अशी राऊत यांच्यावर टिका केली होती.

    संजय राऊत यांनी “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट” अशी कॅप्शन देत एक कार्टून शेअर केलं होतं. या कार्टूनमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसल्याचं दिसून येत होतं. यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे पाय समोरील खुर्चीवर असून समोर उभ्या प्रमोद महाजन यांना ‘हॅव अ सीट’ असं म्हणत आहेत. यावेळी खुर्चीच्या बाजूला एक छोटा स्टूल देखील होता. नंतर हे ट्वीट संजय राऊत यांनी डिलीट केलं. दरम्यान, प्रमोद महाजन यांच्यावरील कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारं नव्हतं. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केलं होतं. हे ट्विट डिलीट केलं असलं तरी जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलं आहे. लोकांनी पोहोचवलं आहे, असं सांगतानाच पूनम महाजन सध्या कुठे आहेत? त्यांचं भाजपशी काय नातं आहे?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

    दरम्यान, दिल्ली काबीज करण्यासाठी तयार राहा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, यावर बोलताना राऊत म्हणाले की, दिल्ली काबीज करणं म्हणजे सर्व पक्षांना एकत्र घेऊन भाजपला सत्तेतून हटवणं. त्यालाच दिल्ली काबीज करणं म्हणतात. आज एक दोन व्यक्तिंच्या हातात दिल्ली आहे. दिल्लीवर देशाचं वर्चस्व पाहिजे. दिल्ली देशाची आहे. एखाद्या राजकीय पक्षाची किंवा एखाद दुसऱ्या व्यक्तिची नाही, असं त्यांनी ठणकावले. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं असं राऊत म्हणाले.

    २३ जानेवारीला हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधल्यानंतर भाजपा नेत्यांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. हिंदुत्वावरुन सध्या शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. संजय राऊत यांनी भाजपाला उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. यावरुन भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.