कट मारल्याने रिक्षाचालकाशी दुचाकीस्वाराने घातला वाद; पुढे या रिक्षावाल्याने काय केले तुम्हीच पहा

रिक्षा चालकाने कुठलीही पर्वा न करता कशाप्रकारे दुचाकीस्वाराला धडक दिली.

मुंबई. रिक्षाचालकांचे बेधडक वाहन चालवणे आणि त्यांची मुजोरी हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. अमानुषपणाचा कळस गाठणारी घटना मुंबई समोर आली आहे. एका दुचाकीस्वारासोबत झालेल्या बाचाबाचीचा बदला एका रिक्षा चालकाने चक्क त्याच्या अंगावर रिक्षा घालून घेतला. या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आले आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रिक्षा चालकाने कुठलीही पर्वा न करता कशाप्रकारे दुचाकीस्वाराला धडक दिली. सुदैवाने या घातपातात दुचाकीस्वाराला विशेष दुखापत झाली नाही, परंतू हा प्रकार त्याच्या जीवावरही बेतू शकला असता.

प्रशांत कांबळे यांनी हा व्हडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या ऑटोचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.