गोत्यात आले ‘भाकरी’चे  गाव ; वाढत्या महागाईच्या झळाने हैराण

आगरी-कोळी समाजाच्या लग्न समारंभाप्रसंगी पारंपरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या हळदी समारंभात मांसाहारी जेवणातही तक्‍का गावातील भाकरीला मोठी मागणी असते.

    नवी मुंबई : इंधनाचे दर वाढल्याने जीवनावश्‍यक वस्‍तूंच्‍या किमतीही वाढल्‍या आहेत. पनवेल तालुक्यात भाकरीचे गाव म्‍हणून ओळख असलेल्‍या ‘तक्‍का’ गावातील भाकरी व्यवसायालाही महागाईच्या झळा बसल्‍या आहेत. भाकरीचे दर १ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय गावातील महिला घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे गावातून भाकऱ्यांचा पुरवठा होणारे हॉटेल, ढाबे आणि खाणावळींमधील भाकरीचा दर दोन ते पाच रुपयांनी वाढविण्यात आला आहे.

    आगरी-कोळी समाजाच्या लग्न समारंभाप्रसंगी पारंपरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या हळदी समारंभात मांसाहारी जेवणातही तक्‍का गावातील भाकरीला मोठी मागणी असते. मात्र इंधन दरवाढीमुळे महिलांनी भाकरीचे दर १ रुपयाने वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता ही भाकरी १६ रुपये प्रतिनग विकली जाते