After Maharashtra, Gujarat is a threat Prime Minister Narendra Modi discussed with Chief Minister Uddhav Thackeray; Took stock of the situation in Maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray') यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांना बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे-हैद्राबाद या बुलेट ट्रेनची मागणी करण्यात आली आहे. पत्रात दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव त्यांनी पंतप्रधानांना दिला आहे. या दोन प्रस्तावांचा उल्लेख रेल्वे मंत्रालयानेही केला होता. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम केल्यास, हे प्रकल्प तातडीने पूर्णत्वाला जातील असा विश्वास व्यक्त केला आहे.

  मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray’) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांना बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे-हैद्राबाद या बुलेट ट्रेनची मागणी करण्यात आली आहे. पत्रात दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव त्यांनी पंतप्रधानांना दिला आहे. या दोन प्रस्तावांचा उल्लेख रेल्वे मंत्रालयानेही केला होता. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम केल्यास, हे प्रकल्प तातडीने पूर्णत्वाला जातील असा विश्वास व्यक्त केला आहे.

  नागपूर-नाशिक-मुंबई हायस्पीड ट्रेनचा प्रस्ताव

  नागपूर-नाशिक-मुंबई ही एक बुलेट ट्रेन करण्यात यावी. तसेच समृद्धी महामार्गाला नांदेड-जालना असा मार्गही जोडला जाणार आहे, तोच मार्ग औरंगाबाद पुणे मुंबई असा करण्यात यावा आणि नांदेडवरुन तो मार्ग पुढे हैदराबादला जोडला जावा आणि हैदराबाद नागपूर मुंबई अशी एक बुलेट ट्रेन करण्यात यावी, असा प्रस्ताव पंतप्रधानांना दिलेला आहे. मात्र पूर्वीचा गुजरात- मुंबई जोडणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाविषयी या पत्रात कोणताही उल्लेख केलेला नाही आणि रेल्वे मंत्रालयाने लवकरात लवकर याचा विचार करावा जेणेकरून महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागेल तसेच हैद्राबादचे मार्केट आणि मुंबईचे मार्केट दोन्ही जोडता येईल, असा प्रस्ताव या पत्राद्वारे मांडण्यात आलेला आहे.

  समृद्धी महामार्गाच्या साथीने रेल कॉरिडॉर

  मुख्यमंत्र्यानी पत्रात नमूद केले आहे की, एनएचएसआरसीएलने नागपूर-मुंबई कॉरिडॉरसाठी पर्यायाचा अभ्यास केला आहे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या साथीने हायस्पीड रेल कॉरिडॉर (एचएसआरसी) विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. समृद्धी महामार्ग हा एक प्रवेश नियंत्रित हरित महामार्ग प्रकल्प आहे. त्याची रुंदी 120 मीटर राइट ऑफ वे (आरओडब्ल्यू) तर लांबी 701 किमी आहे. 15 मार्च 2021 रोजी एनएचएसआरसीएल प्रतिनिधींनी पर्याय सादर केला आणि नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसोबत समृद्धी महामार्गाची तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्यता अभ्यासण्याची विनंती केली. प्रस्तावित रेल्वे कॉरिडॉर हा एलिव्हेटेड (उन्नत मार्ग) असून वर आणि खाली लांबी आणि रुंदी अंदाजे 17.50 मीटर असेल.

  पुणे आणि औरंगाबाद हायस्पीड मार्गही आवश्यक

  त्याचप्रमाणे पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की मुंबई-नागपूर हा मार्ग मुंबई-नाशिक-औरंगाबादला जोडतो. तर मुंबई-हैदराबाद मार्गाचे विद्यमान रचनेनुसार मुंबई ते पुणे हायस्पीड रेल मार्गाला जोडते. महाराष्ट्र सरकारने पुणे आणि नाशिक दरम्यान सेमी-हायस्पीड रेल्वेची योजना आखली आहे. पुणे आणि औरंगाबाद यांच्यात हायस्पीड रेल कनेक्टिव्हिटी झाल्यास हे चतुर्भुज पूर्ण होईल. हा सर्वात महत्त्वाचा औद्योगिक कॉरिडॉर आहे. तर पुणे-नाशिक-औरंगाबाद त्रिकोण आधीच राज्यातील वाहन उद्योगाचा आधारभूत आहे असे मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.