शिवसेना नेत्यांवर कारवाईत कुठलेही राजकारण नाही : सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर सक्तवसुली संचलनालय (ईडी) ची होणारी कारवाई हा त्या यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही असे मत भाजप नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यानी व्यक्त केले आहे.

    मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर सक्तवसुली संचलनालय (ईडी) ची होणारी कारवाई हा त्या यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही असे मत भाजप नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यानी व्यक्त केले आहे. ते  म्हणाले. यापूर्वीही अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या आहेत. तेव्हा ओरड का नव्हती? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

    रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे

    राज्यात गुल आब चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर मराठवाडा, विदर्भात महापूर परिस्थिती पाहता सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. केवळ केंद्र सरकार मदत करत नाही अशी टीका करत फिरू नये असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे असा सल्ला ही मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.