
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचारी संपावर आहे. हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने आधी वेतनवाढीचा पर्याय दिला. मात्र, कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची ऑफर धुडकावून लावली. अशातच, राज्य सरकारने आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, तरीही एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मेस्मा लावा किंवा आम्हाला फाशी द्या, विलीनीकरणाशिवाय माघार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे(There is no retreat without a merger, even if hanged; Strict role of ST staff).
मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचारी संपावर आहे. हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने आधी वेतनवाढीचा पर्याय दिला. मात्र, कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची ऑफर धुडकावून लावली. अशातच, राज्य सरकारने आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, तरीही एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मेस्मा लावा किंवा आम्हाला फाशी द्या, विलीनीकरणाशिवाय माघार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे(There is no retreat without a merger, even if hanged; Strict role of ST staff).
आंध्रप्रदेशच्या धर्तीवर विलिनीकरण करा
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे कर्मचारी गृहित धरावे यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची बाजू जाणून घेतली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि सचिव हनुमंत ताटे यांनी मुख्य सचिव अध्यक्ष असलेल्या समितीसमोर एसटीच्या शासकीय विलिनीकरणासंदर्भात आपली बाजू मांडली. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करा, अशी मागणी एसटी संघटनेने समितीसमोर ठेवली.
सरकारच्या संवेदना हरवल्या
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत सरकारीची भूमिका लोकशाही विरोधात आहे. तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून भरपूर सहकार्य केले. मात्र, राज्य सरकार दोन पाऊल पुढे यायला तयार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीत, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत ‘मेस्मा’ लावण्याऐवजी चर्चेतून प्रश्न सोडवावा, असा सल्ला फडणवीस यांनी सरकारला दिला.