ठाकरे मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ होणार! काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डिच्चू तर काहीच्या खात्यात फेरबदलाची शक्यता; राजीनामा देण्याबाबत मंत्र्यांत नाराजी

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता आहे. काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डिच्चू तर काहीच्या खात्यात फेरबदल होण्याचे संकेत दिले जात आहे(There will be a big upheaval in Thackeray's cabinet! The possibility of a reshuffle in the accounts of some Congress ministers). पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसह दिग्गज नेते दिल्लीला गेल्याने पंजाब, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही बदलांचे वारे वाहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

  मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता आहे. काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डिच्चू तर काहीच्या खात्यात फेरबदल होण्याचे संकेत दिले जात आहे(There will be a big upheaval in Thackeray’s cabinet! The possibility of a reshuffle in the accounts of some Congress ministers). पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसह दिग्गज नेते दिल्लीला गेल्याने पंजाब, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही बदलांचे वारे वाहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

  सहा विधानपरिषदेच्या जागां बिनविरोध

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत भाजपच्या नेत्यांच्या सौजन्याने कॉंग्रेसचा एक खासदार आणि एक आमदार बिनविरोध नियुक्त झाला आहे. मात्र सहा विधानपरिषदेच्या जागांवर आता भाजपने बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रस्ताव पटोले यांच्यासमोर ठेवला आहे त्याकरीता त्यांना पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणे आवश्यक असल्याने ते दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या शिवाय डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पटोले यांच्या तिक्त विधानसभा अध्यक्ष पदावरही कॉंग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतेही नाव अंतिम करण्यात आले नाही, काँग्रेसकडून यानावावर शिक्कामोर्तब होताना राज्यमंत्रिमंडळातील दिग्गज नेत्याला त्याग करावा लागण्याची शक्यता आहे.

  राजीनामा देण्याबाबत मंत्र्यांत नाराजी

  एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन विधानसभा अध्यक्षपदी त्याची नियुक्ती केल्यास रिक्तजागी नाना पटोले यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील महिला सदस्य प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र पदाचा राजीनामा देण्याबाबत मंत्र्यांत नाराजी असल्याने पक्षश्रेष्ठीना आता निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी पटोले मंगळवारी दिल्लीला रवाना झाल्याने घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

  महत्वाच्या मंत्र्यांना दिल्लीत पाचारण

  विधानसभा अध्यक्षपदाच्या नावावर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी तीनही पक्षांत सहमती व्हावी लागणार असून या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष हमखास निवडला जाणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यात विधानसभा अध्यक्षाच्या नावावर चर्चा होऊ शकते. पटोले यांच्या पाठोपाठ काही महत्वाच्या मंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. सध्या मंत्रीपदावर १२ जण आणि विधानसभा अध्यक्षपदाचे रिक्त पद अशी तेरा पदे कॉंग्रेसपक्षाकडे आहेत.