…ही तर सरकारची मुस्कटदाबी : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

किरीट सोमय्या मंत्री हसन मुश्रीफ यांचा कथित घोटाळा उघड करण्यासंदर्भात कागदपत्र एकत्रित करण्यासाठी कोल्हापूरला जाणार होते परंतु त्यांच्यावर 144 कलम लावून त्यांना कोल्हापूरला येण्यासाठी अटकाव घातला. असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

    सन्मानीय किरीट सोमय्या यांच्यासंदर्भात जी कारवाई राज्यशासन करत आहे ती अत्यंत अयोग्य आहे, त्यांचा मी निषेध व्यक्त करतो. किरीट सोमय्या मंत्री हसन मुश्रीफ यांचा कथित घोटाळा उघड करण्यासंदर्भात कागदपत्र एकत्रित करण्यासाठी कोल्हापूरला जाणार होते परंतु त्यांच्यावर 144 कलम लावून त्यांना कोल्हापूरला येण्यासाठी अटकाव घातला. असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

    ते देवदर्शन करून कोल्हापूर एक्सप्रेसने जाणार होते. परंतु अशाप्रकारे अटकाव घालून मुस्कटदाबी सरकार करू शकत नाही. लोकशाहिला शोभा न देणारी कारवाई आहे. या कारवाईचा निषेध व्यक्त करतो. कोंबड झाकल तर उजाडायचं राहत नाही. असे प्रविण दरेकर म्हणाले.

    पुढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांना ज्या कारवाई करायच्या आहे ते करतील अशाप्रकारे सरकारच्या अशा कारवाईने सत्य लपवता येत नाही. ही कारवाई लोकशाहीला मारक आहे