हम हैं मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है…संजय राऊतांचं हे ट्वीट ठरतंय चर्चेचा विषय

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात वादळ आल्याचं चित्र आहे. परंतु खासदार संजय राऊत यांनी मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. आता मात्र त्यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात वादळ आल्याचं चित्र आहे. परंतु खासदार संजय राऊत यांनी मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. आता मात्र त्यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

    संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, हमको तो तलाश बस नए रास्तों की है ..हम हैं मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है…’ संजय राऊत यांच्या या ट्वीटचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला असताना राऊत यांनी आता स्वतःच यावर उत्तर दिलं आहे. माझ्या ट्वीटचा अर्थ लवकरच कळेल, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच या ट्वीटचा संबंध नक्कीच पुढे घडणाऱ्या काही घटनांसोबत राऊत यांनी जोडला आहे.