यूपीएमध्ये नसणाऱ्यांनी ही फुकटची वकिली करू नये; नाना पटोलेंचा संजय राऊतांना टोला

कांग्रेसच्या नेत्यावर टीका केली जात असेलं तर, ते आम्ही सहन करणार नाही, असा ईशारा पटोलेंनी दिला. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ‘सामना’चे संपादक आहेत हे माहिती आहे. परंतु ते शरद पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत असंही पटोले बोलत होते.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी UPA चे अध्यक्ष व्हाव, अस विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते नाराज झाल्याचं दिसून येत आहे. याचं पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

    संजय राऊत हे काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसमुळे आहे. ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी, असा रोखठोक इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. तसेच यूपीएच्या अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवावी, असेही पटोले म्हणाले.

    दरम्यांन संजय राऊत यांची वक्तव्य पाहता ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, असा प्रश्न पडला आहे. दिल्लीत यूपीए २ स्थापन करण्याच्या हालचाली व त्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांकडे यूपीएचे नेतृत्व सोपवावे, ही केलेली मागणी हास्यास्पद आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षात आहेत की शिवसेनेत हे तपासावे लागेल. अशी टीका यांनी केली.

    देशात काँग्रेसची सत्ता असताना शरद पवार मंत्री होते. हे नेहमी लक्षात ठेवावं. त्यामुळे कांग्रेसच्या नेत्यावर टीका केली जात असेलं तर, ते आम्ही सहन करणार नाही, असा ईशारा पटोलेंनी दिला. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ‘सामना’चे संपादक आहेत हे माहिती आहे. परंतु ते शरद पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत असंही पटोले बोलत होते. याबाबत लवकरचं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काँग्रेसमुळे हे सरकार आहे. ही बाब लक्षात आणून देणार असल्याचं पटोले म्हणाले. त्यामुळे पीएमध्ये नसणाऱ्यांनी ही फुकटची वकिली करू नये, असा टोलाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला.