
जुना मोबाईलच्या बदल्यात नवी भांडी विकण्यासाठी आलेल्या महिलेने तीन महिन्याच्या मुलीला पळवल्याची घटना काळा चौकी परिसरात घडली आहे(three month old Baby Kidnapping In Mumbai kalbadevi n). या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.
मुंबई : जुना मोबाईलच्या बदल्यात नवी भांडी विकण्यासाठी आलेल्या महिलेने तीन महिन्याच्या मुलीला पळवल्याची घटना काळा चौकी परिसरात घडली आहे(three month old Baby Kidnapping In Mumbai kalbadevi n). या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.
मंगळवारी 30 नोव्हेंबरला सपना बजरंग मगदूम या त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीसोबत घरात होत्या. यावेळी एक 30-35 वर्षांची अनोळखी महिला त्यांच्या घरी आली. ती जुन्या मोबाईलच्या बदल्यात कपडे ठेवण्याची बास्केट विकण्यासाठी आल्याचे तिने सांगितले. महिलेला ती बास्केट घ्यायची होती. त्यामुळे ती जुने मोबाईल घेण्यासाठी आतील खोलीत गेली.
तेव्हा या महिलेने मागून येत अगदी फिल्मी स्टाईलने महिलेच्या नाकाला गुंगीचे औषध लावले. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली. तेव्हा आरोपी महिलेने पलंगावरील ३ महिने १५ दिवसांच्या मुलीचे अपहरण केले. अपहरण झालेल्या बाळाचे नाव वेदा बजरंग मगदूम आहे. आपले बाळ चोरुन नेले, या घटनेने कासावीस झालेल्या महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी काळाचौकी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.