मुंबई महापालिकेतून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत – नगरसेवक फुटण्याच्या भीतीने तिन्ही पक्ष सावध

मुंबई महापालिकेतून(BMC) विधान परिषदेच्या(Legislative Council Seats Election) दोन जागांसाठी भाजपकडून राजहंस सिंह, शिवसेनेकडून सुनिल शिंदे यांनी अर्ज भरल्यानंतर संख्याबळ कमी असल्याने काँग्रेस अर्ज भरणार नाही अशी शक्यता होती. मात्र शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता चुरस निर्माण झाली आहे.

    मुंबई : मुंबई महापालिकेतून(BMC) विधान परिषदेवर(Legislative Council Seats) दोन जागा निवडून द्याव्या लागणार आहेत. (Three Parties To Fight In Election) शिवसेना(Shivsena), भाजपकडे(BJP) पुरेसे संख्याबळ असल्याने हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येतील, अशी स्थिती असताना काँग्रेसनेही(Congress) उमेदवार अर्ज भरल्याने आता तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे नगरसेवक फुटण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षाने खबरदारी घेतली आहे. दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख असणार आहे. तर १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे.

    मुंबई महापालिकेतून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी भाजपकडून राजहंस सिंह, शिवसेनेकडून सुनिल शिंदे यांनी अर्ज भरल्यानंतर संख्याबळ कमी असल्याने काँग्रेस अर्ज भरणार नाही अशी शक्यता होती. मात्र शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता चुरस निर्माण झाली आहे. दोन जागांसाठी तीन उमेदवार असल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे. मतदानाच्यावेळी नगरसेवक फुटण्याची भीती असल्याने सर्वच राजकीय पक्ष सावध झाले आहेत.

    १० डिसेंबरला मतदान होईपर्यंत आपल्या नगरसेवकांना विरोधी पक्षापासून सांभाळून ठेवण्याचे काम पक्षांना करावे लागणार आहे. निवडणुकीत काँग्रेसने तिसरा उमेदवार दिल्याने इतर पक्ष सावध झाले आहेत. विधान परिषदेवर पहिल्याच फेरीत निवडून जाण्यासाठी ७७ मतांचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. यावेळी काँग्रेस उमेदवार अर्ज मागे घेणार का याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. १० डिसेंबर रोजी पालिका मुख्यालयात सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. १४ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होईल.

    पालिकेतील पक्षीय बलाबल: शिवसेना – ९९,भाजप – ८३,काँग्रेस – ३०,राष्ट्रवादी – ८,समाजवादी पार्टी – ६,मनसे – १,एम आय एम – २. एकूण २२९