Tobacco dance goes viral on social media; If you look at the dance steps ...

    मुंबई : नागीन डान्ससह भन्नाट डान्स स्टेप आपण पाहिल्या आहेत. यानंतर आता लग्नात तंबाखु डान्स करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याचे डान्स स्टेप्स पाहून हसू अनावर होत आहे.

    तंबाखु डान्स या कॅप्शनसहित हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडित तरुणाच्या डान्स स्टेप्स एकदम भन्नाट आहेत. हा तरुण गर्दीपासून वेगळा एकटाच डान्स करत आहे. यात तो तंबाखु मळतानाची स्टेप करत दिसत आहे. त्याचा या डान्स स्टेपवर अनेक कमेंट्स येत आहेत.