आज शेवटचा दिवस! समीर वानखेडेंचा एनसीबीमधील कार्यकाळ संपला; 300 हून अधिक जणांना अटक आणि ड्रग्ज माफियांविरोधात धडाकेबाज कारवाई

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ अखेर संपला. सेवामुदतवाढ न मागितल्यामुळे एनसीबीमधील त्यांची कारकिर्द संपुष्टात आली( Sameer Wankhede's tenure in NCB ends; More than 300 arrested and cracked down on drug mafias). वानखेडे यांना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

    मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ अखेर संपला. सेवामुदतवाढ न मागितल्यामुळे एनसीबीमधील त्यांची कारकिर्द संपुष्टात आली( Sameer Wankhede’s tenure in NCB ends; More than 300 arrested and cracked down on drug mafias). वानखेडे यांना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

    दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीपर्यंत केलेल्या कारवाईमुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. वानखेडे हे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत.

    96 जणांना अटक

    वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपत असून, त्यांनी मुदतवाढ नाकारल्याचे निवेदन एनसीबीने जारी केले होते. ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत त्यांनी 96 जणांना अटक केली असून 28 गुन्हे दाखल केले. 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक केली आणि 117 गुन्हे दाखल केले.

    एनसीबीने पुढे माहिती दिली की वानखेडे यांनी सुमारे 1000 कोटी रुपयांचे 1791 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गोठवली. वानखेडे यांनी एनसीबीमध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिटचे (एआययू) उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. नंतर त्यांची कस्टम्स विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि मुंबई विमानतळावर त्यांची नियुक्ती झाली. मुंबई एअर इंटेलिजेंस युनिटमध्ये काम करत असताना त्यांनी कस्टम ड्युटी चुकवणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना पकडले.