आज पंतप्रधान नरेंद मोदी देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, कोरोनाच्या परिस्थिचा आढावा जाणून घेणार

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचसोबत ओमायक्रॉनसही सावट देशावर पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. आणि त्या राज्यातील कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे जाणून घेणार आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे आणि ओमायक्रॉनचे रुग्ण किती आहेत, आणि काय स्थिती आहे याचा पंतप्रधान आढावा घेणार आहेत.

    नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूने थैमान मांडले आहे. त्यामुळं देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचसोबत ओमायक्रॉनसही सावट देशावर पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. आणि त्या राज्यातील कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे जाणून घेणार आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे आणि ओमायक्रॉनचे रुग्ण किती आहेत, आणि काय स्थिती आहे याचा पंतप्रधान आढावा घेणार आहेत.

    दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याना बोलण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ दिला आहे. या वेळेत ते त्या त्या राज्याची सद्य परिस्थिती जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे मत जाणून घेणार आहेत, त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना काही सूचना देणार आहेत. काही नियमावली सांगणार आहेत, असे समजते. बुधवारी राज्यात ४६ हजारपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळं टेन्शन वाढले आहे.

    मात्र, या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार की नाहीत. याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत नसल्यामुळं ते हजर राणार नसल्याचं राज्याचे मुख्य सचिव देबशिष चक्रवर्ती यांनी पीएम कार्यालयाला तसे कळविल्याची माहिती आहे समोर येत आहे. सीएम यांना उपस्थित राहता येत नसून त्या ऐवजी आरोग्य मंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित राहतील असे या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. पंतप्रधान यांनी बोलावलेल्या इतकया महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत असली तरी, उपस्थित राहतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.