sanjay raut

तीन नव्या कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) शेतकरी आंदोलन करत आहेत. आज आंदोलनाचा (Agitation) २८ वा दिवस आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये (Central Government) बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजचा कृषीदिन (Agriculture Day)  हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या (Delhi) सिंधू सीमेवर तीन नव्या कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) शेतकरी आंदोलन करत आहेत. आज आंदोलनाचा (Agitation) २८ वा दिवस आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये (Central Government) बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजचा कृषीदिन (Agriculture Day) हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

आजचा कृषीदिन हा शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’ आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करतोय तसेच मुंबईतही आंदोलन सुरू केलंय. केवळ काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार हा कायदा रेटू पाहतंय . त्यांना शेतकऱ्यांच्या हिताच काही पडलेलं नाही. आंदोलकांचे जीव जातायत, पण सरकार तरीही त्याकडे दुर्लक्ष करतंय यापेक्षा मोठं दुर्दैव काय ? असं म्हणतं संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि उद्योगपती यांच्यावर निशाणा साधला आहे.