राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक, तीन मोठे निर्णय होण्याची शक्यता

महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉन वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु आहे. कामावर न परतणाऱ्या कामगारांवर मेस्मा लावण्याचे सरकारने ठरवले आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज राज्य सरकार कोणते निर्णय घेते याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

    महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉन वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु आहे. कामावर न परतणाऱ्या कामगारांवर मेस्मा लावण्याचे सरकारने ठरवले आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

    आज होणाऱ्या बैठकीत रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांच्या वाढत्या किमती तसेच महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या वाढत्या ईडी चौकशा यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

    ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो. शाळा सुरु करण्याबाबत आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होऊ शकतो. ओमायक्रॉनचे काही रुग्ण राज्यात देखील सापडले आहेत. कोरोनाची आकडेवारी जरी आटोक्यात असली तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याचा निर्णय तुर्तास स्थगित केला जाऊ शकतो.

    सोबतच सुप्रीम कोर्टानं स्थानि स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर देखील आज चर्चा होऊ शकते. ओबीसी आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळं राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील पावलं उचलण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. त्यामुळे आज राज्य सरकार कोणते निर्णय घेते याकडे राज्याचं लक्ष लागलंय.