Sanjay Raut's scathing statement on BJP's statement of 300 seats in Uttar Pradesh

उद्या मी गोव्यात जात आहे. आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू. आम्ही चर्चा करू. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे आज गोव्यात जात आहेत. त्यांच्याशी चर्चा करून कोण कुठे लढणार हे ठरवू, असं राऊत म्हणालेत. तसेच गोवा छोटं राज्य आहे. गोव्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही. गोव्यात वेगळ्या प्रकारची खिचडी निर्माण होत आहे, असा दावाही त्यांनी केला.

    मुंबई : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आता जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहयला मिळत आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना, उद्या मी गोव्यात जात आहे. आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू. आम्ही चर्चा करू. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे आज गोव्यात जात आहेत. त्यांच्याशी चर्चा करून कोण कुठे लढणार हे ठरवू, असं राऊत म्हणालेत. तसेच गोवा छोटं राज्य आहे. गोव्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही. गोव्यात वेगळ्या प्रकारची खिचडी निर्माण होत आहे, असा दावाही त्यांनी केला.

    दरम्यान, भाजपाचे बंडखोर नेते आणि दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांच्या तिकीटावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. राऊत यांनी पाटील यांच्या या उत्तरांना प्रतित्युत्तर दिलं आहे. उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही. हे फक्त बोलघेवडे आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. उत्पलला तिकीट द्यायचं असतं तर तेव्हाच दिलं असतं. हे बोलघेवडे आहेत. तिकीट का थांबवलं हा मोठा प्रश्न . उत्पल पर्रिकर अपक्ष राहत असतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये एवढंच आमचं म्हणणं होतं. एखाद्या नेत्याबाबत सहानभूती असते. एखाद्या नेत्याच्या कुटुंबातून कोणी उभे राहत असतील तर आपण उमेदवार देत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं राऊत म्हणाले.

    आम्ही उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देऊ असं आम्ही म्हटलं तेव्हा त्यांची पळापळ सुरू झाली. आता त्यांना तिकीट द्यावच लागेल. गोव्यात भाजप दिसत आहे ती केवळ मनोहर पर्रिकरांमुळे. आजही भाजपला मनोहर पर्रिकरांच्या नावाने ओळखले जाते. अन् त्यांच्याच मुलाची लायकी काढता? ज्या मतदारसंघाचं पर्रिकरांनी प्रतिनिधीत्व केलं, त्या मतदारसंघातून माफियाला तिकीट देता त्यावर भाजपने बोललं पाहिजे, तसेच भाजपचं उत्तर प्रदेशात ढोंग सुरू आहे. त्यांच्या राजकारणाला दुर्गंध येत आहे. ममता बॅनर्जींच्या व्हर्च्युअल उत्तर प्रदेशात रॅलीने महौल बदलत असेल आणि अखिलेश यादवांना फायदा होत असेल तर त्यांनी जरूर रॅली करावी, असं मतही संजय राऊत यानी व्यक्त केलं.