
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी खाती पत्नीच्या बँकेत का वळवली, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस यांनी 'ए भाई , तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही 'UTI बैंक / Axis बैंक ' ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय', असं प्रत्युत्तर दिलं होतं. यातील भाषा भाईगिरी आणि गुंडगिरीची असल्याचा मुद्दा उचलत भाई जगतापांनी पुन्हा एक ट्विट करत अमृता फडणवीस यांना टोचलंय.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात जोरदार ट्विटर वॉर रंगलंय. भाई जगतापांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अमृता फडणवीसांनी दिलेलं उत्तर आणि त्यात वापरलेल्या भाषेवरून राज्यभर जोरदार चर्चा सुरू असताना आता पुन्हा एकदा दोघांनीही नवं ट्विट करत या वादात फोडणीच घातलीय.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी खाती पत्नीच्या बँकेत का वळवली, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस यांनी ‘ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय’, असं प्रत्युत्तर दिलं होतं. यातील भाषा भाईगिरी आणि गुंडगिरीची असल्याचा मुद्दा उचलत भाई जगतापांनी पुन्हा एक ट्विट करत अमृता फडणवीस यांना टोचलंय.
जेव्हा आपण खरे असतो तेव्हा खोटे ऐकून ऐकून खराब वटतंच- हे @BhaiJagtap1 ला कसे कळणार ?
एवढे मोठे आहात- वयाने, अनुभवने, संपत्ति ने- थोडं तर खरं बोलायला शिका !
Congress/NCP च्या काळातला- म्हणजे तुमच्याच काळातला २००५ चा- हा अहे विशिष्ट आदेश !
आता तरी चूक कबूल करुन गप बसा! @MiLOKMAT https://t.co/GXQbbnQRyL pic.twitter.com/ucteZFuFfd— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 23, 2021
खरं बोललं की किती टोचतं हे अमृता फडणवीसांच्या भाषेवरून दिसून येतं. मी तर केवळ प्रश्न विचारला होता, असं ट्विट भाई जगताप यांनी केलं. त्याला अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलंय. जेव्हा आपण खरे असतो, तेव्हा खोटे ऐकून त्रास होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तुमच्या काळातला म्हणजेच २००५ चा हा आदेश पाहा आणि गप्प बसा असं म्हणत त्यांनी आदेशाची प्रत ट्विट केलीय.
आता यावर पुन्हा भाई जगतापांकडून काही उत्तर येतं का, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.