बेकायदेशीर गोमांस विक्रीसाठी, दोन आरोपींना रंगेहाथ पकडले, शिवसेना उपविभाग प्रमुखाच्या मुलाचा देखील समावेश

पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर आहे. हे आरोपी बेकायदेशररित्या गोमांस आणून नवी मुंबईत विक्री करणार असल्याची माहिती आरोपींनी दिली. यामध्ये नवी मुंबईतील खैरणे गावातील एका शिवसेना उपविभाग प्रमुखाचा मुलगा देखील असल्याची माहिती समोर आलेय. दोन्ही आरोपींना न्यायालयात दाखल केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    कर्जत येथून काही जण नवी मुंबईत गोमांस विक्री करण्यासाठी आणणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली आसता. नवी मुंबई पोलिसांनी सापळा रचून रिक्षामध्ये असलेले ४० किलो गोमांसासह दोन आरोपींना अटक केली. ही कारवाइ APMC पोलिसांनी केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर आहे. हे आरोपी बेकायदेशररित्या गोमांस आणून नवी मुंबईत विक्री करणार असल्याची माहिती आरोपींनी दिली. यामध्ये नवी मुंबईतील खैरणे गावातील एका शिवसेना उपविभाग प्रमुखाचा मुलगा देखील असल्याची माहिती समोर आलेय. दोन्ही आरोपींना न्यायालयात दाखल केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ४० किलो मांसासह दोन आरोपींना अटक केली. एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावणे यांनी सांगितले की, कर्जत येथून एका रिक्षात दोघे जण गोमांस आणत असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली.रिक्षाने दिलेल्या माहितीच्या आधारे आमच्या पथकाने त्या रिक्षाची तपासणी केली असता त्यात मांस सापडले.

    जे रिक्षाच्या सीटखाली लपवून ठेवली होती, चौकशीदरम्यान दोघांनीही पोलिसांच्या प्रश्नांना नीट उत्तरे दिली नाहीत, त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक करून रिक्षा ताब्यात घेतली. त्यानंतर आरोपी आणि रिक्षा या दोघांनाही पोलिसांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात आणले, तेथे महापालिकेच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून आम्ही त्यांचा नमुना दिला असून, ते मांस कोणत्या प्राण्याचे आहे, याचा शोध घेतला जाईल.

    पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण कायदा 1995 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. निशान पटेल आणि मोहसीन पटेल अशी आरोपींची नावे असून, दोघेही आरोपी कोपरखैरणे येथील रहिवासी आहेत. सध्या हे लोक येथे मांस कोणाला विकतात, याचा पोलीस तपास करत आहेत. जप्त केलेले मांस बैलाचे असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.