मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी दोघांना अटक, एटीएसच्या कारवाईत निलंबित कॉन्स्टेबलही ताब्यात

निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि बुकी नरेश धारे यांना संशयावरून पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या चौकशीतून संशय बळावल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय. या दोघांना मनसुख हिरेन हत्येशी नेमका काय संबंध होता, याचा तपास सध्या एटीएस करतंय. या दोघांच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. 

    प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आल्याचा निष्पन्न झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ही गाडी ज्यांच्या नावे होती, ते उद्योजक मनसुख हिरेन यांचा मृतदेह वसईच्या खाडीजवळ आढळला होता. याप्रकरणी एटीएस तपास करत असून त्यांनी दोन संशयितांना अटक केलीय.

    निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि बुकी नरेश धारे यांना संशयावरून पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या चौकशीतून संशय बळावल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय. या दोघांना मनसुख हिरेन हत्येशी नेमका काय संबंध होता, याचा तपास सध्या एटीएस करतंय. या दोघांच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

    मनसुख हिरेन यांच्या पत्नीनं दिलेल्या जबाबानुसार सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात गेल्या काही महिन्यात अनेक व्यवहार झाल्याचं स्पष्ट होत असल्याचं फडणवीस म्हणाले होते. अनेकदा मनसुख आणि वाझे यांच्या भेटी झाल्याची माहिती मनसुख यांच्या पत्नीने दिली आहे. मनसुख यांची गाडीदेखील वाझेंकडे असल्याची माहिती नोंदवण्यात आलीय. तर सचिन वाझेंनी मनसुख यांना अटक होण्याचा सल्ला दिला होता आणि लवकरच जामीनावर सुटका करण्याचं आश्वासनही दिलं होतं, असं मनसुख यांच्या पत्नीनं जबाबात नोदंवल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं.