लसीचे दोन डोस झालेत? मग तुम्हाला लोकलच्या तिकीटसाठी रांगेत उभ रहाण्याची गरज नाही,फक्त इंस्टॉल करा हे अॅप

ता युनिव्हर्सल पास जारी करणारे राज्य सरकारचे पोर्टल रेल्वेच्या यूटीएस मोबाइल ॲपशी जोडले गेले आहे. ज्यामध्ये वर नमूद केलेल्या श्रेणीतील प्रवासी काउंटरवर न जाता तिकीट खरेदी करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये UTS अॅप इन्स्टॉल करावे लागेल. रेल्वे काउंटरवरील गर्दी कमी करणे हा या सुविधेचा उद्देश आहे. या अॅपच्या मदतीने प्रवास आणि पास दोन्ही तिकिटे जारी केली जातील. २४ नोव्हेंबरपासून प्रवाशांना ही सुविधा मिळण्यास सुरुवात होणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्स हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.

    मुंबई – लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले असतील तर तम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तिकीट बुक करू शकता. मध्य रेल्वेने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, स्मार्टफोनच्या मदतीने तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला रेल्वेचे UTS अॅप इंस्टॉल करावे लागणार आहे.

    मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “यूटीएस मोबाईल अॅ्प आणि युनिव्हर्सल पास लिंकिंगमुळे प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय त्यांचे तिकीट विनाव्यत्यय मिळू शकेल. प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील आणि शेवटच्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी झाला असेल, अशा प्रवाशांना राज्य सरकारच्या पोर्टलद्वारे लसीकरण स्थितीची योग्य पडताळणी केल्यानंतर जारी करण्यात आलेला राज्य सरकारचा युनिव्हर्सल पास घ्यावा लागेल. तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागतो. आता युनिव्हर्सल पास जारी करणारे राज्य सरकारचे पोर्टल रेल्वेच्या यूटीएस मोबाइल ॲपशी जोडले गेले आहे. ज्यामध्ये वर नमूद केलेल्या श्रेणीतील प्रवासी काउंटरवर न जाता तिकीट खरेदी करू शकतात.”

    यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये UTS अॅप इन्स्टॉल करावे लागेल. रेल्वे काउंटरवरील गर्दी कमी करणे हा या सुविधेचा उद्देश आहे. या अॅपच्या मदतीने प्रवास आणि पास दोन्ही तिकिटे जारी केली जातील. २४ नोव्हेंबरपासून प्रवाशांना ही सुविधा मिळण्यास सुरुवात होणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्स हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.