Tourist drowns in Nagaon sea at alibaug

गणपती विसर्जनादरम्यान(Ganesh Immersion) वर्सोवा जेट्टी( 5 People Drowned At Varsova Jetty) येथील समुद्रात परवानगी नसताना गणेश विसर्जनासाठी उतरलेली पाच मुले रविवारी रात्री बुडाली होती. त्यापैकी दोन जणांचा वाचवण्यात यश आले होते. मात्र तिघे जण बेपत्ताच होते.

    मुंबई : अनंत चतुदर्शीला(Anant Chaturdashi) गणपती विसर्जनादरम्यान(Ganesh Immersion) वर्सोवा जेट्टी( 5 People Drowned At Varsova Jetty) येथील समुद्रात परवानगी नसताना गणेश विसर्जनासाठी उतरलेली पाच मुले रविवारी रात्री बुडाली होती. त्यापैकी दोन जणांचा वाचवण्यात यश आले होते. मात्र तिघे जण बेपत्ताच होते. या तिघांपैकी दोन जणांचे मृतदेह आज अग्निशमन दलाला(Fire Brigade Foud 2 Dead Bodies) मिळाले आहेत. एकजण अद्यापही बेपत्ताच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    अनंत चतुदर्शीदिनी रविवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान गणपती विसर्जनसाठी अंधेरी (प.), वर्सोवा, पाटील गल्ली जेट्टी येथील समुद्रात उतरलेली पाच मुले बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव मोहीम राबवण्यात येऊन अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने दोन मुलांना वाचवण्यात यश आले. मात्र तिघांचा शोध घेऊनही त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. रात्री अंधार झाल्याने बोटींनी बचावकार्य मोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर सोमवारी तिघांपैकी दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाला मिळाले. शुभम निर्मल (१८) व संजय तावडे (२०) अशी मृतांची नावे आहेत. विजय म्हात्रे आणि शिवम  निर्मल (१९) या दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अद्यापही एकजण बेपत्ताच आहे. वर्सोवा जेट्टी या ठिकाणच्या समुद्रात गणेश विसर्जनाला बंदी असतानाही काही स्थानिक लोक वर्सोवा जेट्टी येथे विसर्जनासाठी आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.