shiv sena asks central government to stop use of loudspeakers on mosques vb

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात आणि पत्नी- मुलामध्ये संपत्तीच्या वाद सुरु आहे. हाच घरगुती वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे – लांडे यांनी फेसबूकवर पोस्ट आई आणि भावावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी देखील खुलासा केला आहे.

    मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात आणि पत्नी- मुलामध्ये संपत्तीच्या वाद सुरु आहे. हाच घरगुती वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे – लांडे यांनी फेसबूकवर पोस्ट आई आणि भावावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी देखील खुलासा केला आहे.

    मागील २७ वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून वेगळं राहत आहेत. त्यांनी दुसर लग्नही केले आहे. पहिले ५ वर्ष ते एका महिलेसोबत लग्न करून राहत होते. त्यानंतर आता ते दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहतात असे मंदाकिनी शिवतारे म्हणाल्या. मुलगी ममतानं विनय आणि विनस या दोघा मुलांवर केलेले आरोप धांदात खोटे आहेत. यात संपत्तीचा कुठलाही वाद नाही. तसेच त्यांच्या स्थितीला ते स्वत: जबादार असल्याचा दावाही मंदाकिनी यांनी केला आहे.

    ममता शिवतारे – लांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल असे त्यांना वाटत होते, आजही वाटते,’ असे ममता यांनी पोस्ट केली आहे.