कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे साऱ्या देशात आणि जगात कौतुक : उद्योगमंत्री सुभाष देसाई 

उद्योगमंत्री म्हणाले की, मार्च २०२० मध्ये सारे जग भांवावून गेले असताना जी स्थिती होती त्यात आणि आजच्या स्थितीमध्ये खूप अंतर आहे, त्यावेळी अपुरी साधने घेवून कोरोनाला सामोरे जात आपण त्यात सुधारणा करत कोरोनावर दोन लाटामध्ये यशस्वी मात केली आहे.  हे करत असताना कोणतिही लपवाछपवी न करता प्रामाणिकपणे मुख्यमंत्र्यानी स्थितीचा सामना केला असेही देसाई म्हणाले.

  मुंबई :  राज्यात गेल्या दिड वर्षात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लगेच आलेल्या कोरोना संकटाचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी ज्या धिराने सामना केला त्याचे कौतुक जगात आणि देशात झाल्याचे प्रशस्ती पत्र उद्योगमंत्री सुभाष देसाई यानी शिवसेना वर्धापनदिनाच्या व्हर्चुअल कार्यक्रमात दिले.

  शिवसेना एक नाही अनेक पावले पुढे

  ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना एक नाही अनेक पावले ठामपणे टाकत पुढे जात आहे. राज्यात तीन पक्षांच्या आघाडी सोबत जाण्याचे धाडसी राजकारण यशस्वी करत नेतृत्व करत असताना प्रशासनासोबत कोरोनासारख्या संकटात ठामपणे टिकेची पर्वा न करता मुख्यमंत्री काम करत आहेत त्याचा आदर्श सर्वानी घ्यावा असे मत न्यायालये, जागतिक आरोग्य संस्था यानी देखील व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

  प्रामाणिकपणे स्थितीचा सामना

  उद्योगमंत्री म्हणाले की मार्च २०२० मध्ये सारे जग भांवावून गेले असताना जी स्थिती होती त्यात आणि आजच्या स्थितीमध्ये खूप अंतर आहे, त्यावेळी अपुरी साधने घेवून कोरोनाला सामोरे जात आपण त्यात सुधारणा करत कोरोनावर दोन लाटामध्ये यशस्वी मात केली आहे.  हे करत असताना कोणतिही लपवाछपवी न करता प्रामाणिकपणे मुख्यमंत्र्यानी स्थितीचा सामना केला असेही देसाई म्हणाले.

  कोरोनामुक्त राज्य करण्याची प्रतिज्ञा

  त्यामुळे भविष्यातही अश्याच प्रकारे कोरोनामुक्त गाव, शहर आणि राज्य करण्याचा संकल्प करून आपण वर्धापनदिनी संकल्प पूर्ण करण्याची प्रतिज्ञा करू असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना सचिव आदेश बांदेकर यानी केले ते म्हणाले की, गेल्या पंचावन वर्षात सामान्य माणसाला न्याय देण्यसाटी शिवसेना उभी आहे आणि त्या कार्याला दिशा देण्यासाठी उध्दव ठाकरे नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत.