Underground Trash Traps Trapped in Utilities Trap! There is no space for garbage bins in Mumbai

मुंबईत अत्याधुनिक भूमिगत कचरा पेट्या बनवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. मात्र पदपथांखालून जाणा-या युटीलिटीजच्या जाळ्यांमुळे कचरा पेट्यांचे लक्ष्य प्रशासनाला गाठताच आलेले नाही. या बाबतचा प्रस्ताव तयार असला तरी यासाठी जागाच निश्चित करण्यात आलेली नाही. शिवाय पदपथांखालून युटीलिटीज जात असल्याने भूमिगत कचरा पेट्या बनवता आले नसल्याचे सांगण्यात आले(Underground Trash Traps Trapped in Utilities Trap! There is no space for garbage bins in Mumbai).

    मुंबई : मुंबईत अत्याधुनिक भूमिगत कचरा पेट्या बनवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. मात्र पदपथांखालून जाणा-या युटीलिटीजच्या जाळ्यांमुळे कचरा पेट्यांचे लक्ष्य प्रशासनाला गाठताच आलेले नाही. या बाबतचा प्रस्ताव तयार असला तरी यासाठी जागाच निश्चित करण्यात आलेली नाही. शिवाय पदपथांखालून युटीलिटीज जात असल्याने भूमिगत कचरा पेट्या बनवता आले नसल्याचे सांगण्यात आले(Underground Trash Traps Trapped in Utilities Trap! There is no space for garbage bins in Mumbai).

    मुंबई महापालिकेने मुंबईतील विविध ४० भूमिगत कचरा पेट्या निर्माण करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती. परंतु आजमितीस महापालिकेला केवळ १२ ठिकाणीच या कचरा पेट्या बनवता आल्या आहेत. महापालिकेने यासाठी निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करताना कोणत्याही प्रकारची जागा निश्चित केली नव्हती. त्यामुळे कंत्राटदाराची निवड केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाने जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुंबईतील २४ विभाग कार्यालयांना पत्र पाठवून जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पदपथांखालून जाणाऱ्या युटीलिटीजमुळे या कचरा पेट्या उभारणीत मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे महापालिकेने समुद्र चौपाटीजवळ किंवा रुग्णालयांच्या परिसरांमध्ये अशा प्रकारच्या कचरा पेट्या उभारल्या आहेत.

    समुद्र चौपाट्यांवर या पेट्या उभारणे आवश्यक असले तरी सीआरझेडमुळेही तिथे उभारण्यात अडचणी येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापनातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्व उपनगरांत सर्व प्रथम भूमिगत कचरा पेटी बसवण्यात आली, तर चेंबूरमध्ये आतापर्यंतची शेवटची कचरा पेटी बसवण्यात आली आहे. मुंबईत ए, डी, तसेच मालाड आणि बोरीवली आदी भागांमध्ये सर्वात प्रथम कचरा पेटी प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आल्या होत्या.
    महापालिकेने प्रथम चार ठिकाणी भूमिगत कचरा पेट्या बनवल्या होत्या. त्यानंतर ४० ठिकाणी बनवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती. त्यामुळे महापालिकेने जागा निश्चित न करता आधीच कंत्राटदाराची नेमणूक का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    जागा उपलब्ध होत नसल्याने या कचरा पेट्यांची उभारणी होत नाही. त्यामुळे प्रशासनाने निविदा का काढली, असाही प्रश्नही उपस्थित होत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भूमिगत कचरा पेट्या या पदपथांवरच बसवणे आवश्यक आहे. परंतु पदपथावर या कचरा पेट्या बसवता येत नसल्याने नव्याने निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण वसाहतींच्या परिसरांमध्ये अशा प्रकारच्या कचरा पेट्या बसवणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

    आतापर्यंत कुलाबा, नायर रुग्णालय, चेंबूर पूर्व, जुहू चौपाटी, कांजूर मार्ग मयुर गार्डनसमोर, के डी कंपाऊंड कांदिवली पश्चिम, भायखळा राणीबाग येथे या कचरा पेट्या बसवण्यात आल्या आहेत.