वाहतूकीसाठी नवीन नियम, आता ८ आसनी कारमध्ये ६ एअर बॅग्ज अनिवार्य, क्रेंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

आठ आसनी कारमध्ये 6  एअर बॅग्ज अनिवार्य करण्यात आल्यात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही अतिशय महत्वाची घोषणा केलीय. सध्या भारतात अनेक कारमध्ये चालक आणि त्या बाजूच्या आसनासाठी एअर बॅग्जची सुविधा असते. मात्र मागच्या आसनांवर बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी विशेष सोय नसते. मात्र आता मागच्या आसनांसाठी देखील एअर बॅग्ज लावण्यात येणार असल्यामुळं प्रवाशांची सुरक्षितता वाढणार आहे.

    नवी दिल्ली : रोड सेफ्टीला आधिक चांगले बनविण्यासाठी किंवा वाहतूक अधिक सुरक्षित होण्यासाठी केंद्र सरकारनं आणखी एक पाऊल उचलले आहे. तुमच्याकडे 8 आसनी कार असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण आठ आसनी कारमध्ये 6  एअर बॅग्ज अनिवार्य करण्यात आल्यात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही अतिशय महत्वाची घोषणा केलीय. सध्या भारतात अनेक कारमध्ये चालक आणि त्या बाजूच्या आसनासाठी एअर बॅग्जची सुविधा असते. मात्र मागच्या आसनांवर बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी विशेष सोय नसते. मात्र आता मागच्या आसनांसाठी देखील एअर बॅग्ज लावण्यात येणार असल्यामुळं प्रवाशांची सुरक्षितता वाढणार आहे. दरम्यान एअरबॅग्सची संख्या वाढल्यामुळं कारची किंमत देखील वाढणार आहे. यामुळं प्रवासामधील सुरक्षितता सुधा वाढेल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

    दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, हा निर्णय एम१ कॅटॅगरीमधील कारसाठी घेण्यात आला आहे. एम१ कॅटॅगरीमध्ये ५ ते ८ सिटर कारचा समावेश आहे. अशाप्रकारे मिड-रेंजच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग असणे अनिवार्य असेल. या नव्या निर्णयानंतर कारमध्ये दोन साइड एअरबॅग आणि दोन साईड कार्टेनसुद्धा लागतील. त्यामुळे कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांसाठीसुद्धा सुरक्षा सुनिश्चित होणार आहे. तसेच याचे फायदे सुद्धा होणार असल्याचं गडकरी म्हणाले.

    केंद्र सरकारने यापूर्वी पहिल्या ड्रायव्हर सिटसाठी एअरबॅन अनिवार्य केलं होतं. यावर्षी १ जानेवारी २०२२पासून सर्व कारमध्ये ड्रायव्हरसह को-पॅसेंजरच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कारमध्ये दोन एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर निश्चितपणे कार कंपन्यांचा खर्च वाढणारा आहे. एक एअरबॅगची किंमत १८०० ते २००० रुपयांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत ६ एअरबॅग लावण्यासाठी एकूण १० ते १२ हजार रुपये खर्च होणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या मते एअर बॅगची मागणी वाढल्याने याची किंमत कमी होणार आहे. तसेच प्रवासात अधिक सुरक्षितता येईल असा विश्वास केंद्र सरकारला आहे.