sonia gandhi

"पवार हे एक जनतेतील नेते असल्याने पंतप्रधानपदासाठी पात्र होते. काँग्रेसने त्यांना मनमोहन सिंग यांच्या जागी पंतप्रधान बनवायला हवे होते, पण सोनिया गांधींनी तसे केले नाही. जर पवार 2004 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसला आज असे दुर्दैवी दिवस सहन करावे लागले नसते.”

    2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परदेशी वंशाचा मुद्दा गाजला होता. या चर्चेला अनावश्यक ठरवत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, “जर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकल्या तर इटलीमध्ये जन्मलेल्या सोनिया गांधी देखील 17 वर्षापूर्वी झालेल्या काँग्रेसच्या विजयानंतर भारताच्या पंतप्रधान होऊ शकतात.”

    केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी हॅरिस यांच्यासोबत बैठकही घेतली. जेव्हा 2004 च्या निवडणुकीत यूपीएला बहुमत मिळाले, तेव्हा मी सोनिया गांधींना भारताच्या पंतप्रधान व्हावे असा प्रस्ताव दिला होता. माझे मत होते की त्यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्याला काही अर्थ नाही.’

    “पवार हे एक जनतेतील नेते असल्याने पंतप्रधानपदासाठी पात्र होते. काँग्रेसने त्यांना मनमोहन सिंग यांच्या जागी पंतप्रधान बनवायला हवे होते, पण सोनिया गांधींनी तसे केले नाही. जर पवार 2004 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसला आज असे दुर्दैवी दिवस सहन करावे लागले नसते.”

    दरम्यान, शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या इटालियन वंशाच्या असण्यावरुन काँग्रेसच्या नेतृत्वशी वाद घातला होता. यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पीए संगमा आणि तारिक अन्वर यांच्यासह 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादीची स्थापना केली. शरद पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत.