रक्तदानासाठी मुंबई विद्यापीठ सरसावले ! रासेयोतर्फे १०० शिबिरांचे आयोजन ७२१६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

'काेराेना या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीतही विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, कार्यक्रम अधिकाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन अत्यंत समाजपयोगी उपक्रम राबविला आहे. समाजसेवेचा वसा हा असाच पुढे अविरत सुरू ठेवला जाणार आहे.' – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

मुंबई:काेराेनामुळे उद्भवलेल्या संकटामुळे अनेक ठिकाणी बंद करण्यात आलेली रक्तदान शिबिरे आणि रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाल्यान मागील काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. ज्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन राज्य आराेग्य विभागाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर आराेग्य विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत १०० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून ७२१६ युनिट रक्त जमा करण्यात आले असून शासकीय रक्तपेढीत ते जमा करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील मुंबई शहर ५, मुंबई उपनगरे २०, ठाणे ७ , पालघर ६ , रायगड ६ रत्नागिरी ८ आणि सिंधुदूर्ग येथे १ असे सात जिल्ह्यात ५४ शिबिरे, रेल्वेस्थानके आणि तत्सम ठिकाणी ४२ शिबिरे, इतर संघटनांसोबत आयोजित करण्यात आलेली ४ शिबिरे अशा एकूण १०० शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होती. ही सर्व शिबिरे एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली आहेत. या सर्व शिबिराना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंमसेवक, कार्यक्रम अधिकारी आणि सर्वसामान्य नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक यांनी सांगितले.

“काेराेना या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीतही विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, कार्यक्रम अधिकाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन अत्यंत समाजपयोगी उपक्रम राबविला आहे. समाजसेवेचा वसा हा असाच पुढे अविरत सुरू ठेवला जाणार आहे.” – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ