उत्तर प्रदेश निवडणुकीत आपला पराभव होईल, ही भाजपाला भीती – नाना पटोले

ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत, निवडणूका पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे सर्वच पक्षाचे धाबे दणाणले आहेत. एकीकडे कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत गंगेत मृतदेह तरंगत असताना, भाजपाने प्रचाराच्या मोठमोठ्या सभा घेऊन कोरोणा वाढवण्याचे काम केले होते. व दुसरी लाट असताना सुद्धा केंद्र सरकारने निवडणुका घेतल्या होता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

    मुंबई:हिवाळी अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले असताना, आणि आजच्या तिसऱ्या दिवशी विरोधक मुख्यमंत्री गैरहजर यावरून अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगत आहे.

    दरम्यान ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत, निवडणूका पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे सर्वच पक्षाचे धाबे दणाणले आहेत. एकीकडे कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत गंगेत मृतदेह तरंगत असताना, भाजपाने प्रचाराच्या मोठमोठ्या सभा घेऊन कोरोणा वाढवण्याचे काम केले होते. व दुसरी लाट असताना सुद्धा केंद्र सरकारने निवडणुका घेतल्या होता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक सोमवारी होणार आहे, दरम्यान त्या बाबतचे पत्र आम्ही राज्यपालांना पाठवले आहे. राज्यपाल याच्यावर विचार करून निर्णय देतील असं सुद्धा नाना पटोले यांनी म्हटले. तर कर्नाटकमध्ये मराठी माणसावर होणारा अन्याय यावर राज्यातील भाजपाचे नेते मूग गिळून का गप्प आहेत? ते का बोलत नाहीत असा सुद्धा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. तसेच ओमायक्रोनचे रुग्ण जर वाढत असतील तर सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे असे सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले