
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC ने मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये एकूण 761 विद्यार्थी निवडले आहेत. बिहारचा शुभम कुमार (रोल नंबर 1519294) अव्वल आहे.
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC ने मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये एकूण 761 विद्यार्थी निवडले आहेत. बिहारचा शुभम कुमार (रोल नंबर 1519294) अव्वल आहे. शुभमने आयआयटी बॉम्बेमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे. पहिल्या 25 मध्ये 13 पुरुष आणि 12 महिला आहेत. त्याचबरोबर 5 महिलांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे.
भोपाळच्या जागृती अवस्थीने दुसरा आणि आग्राच्या अंकिता जैनला तिसरा क्रमांक मिळाला. यावर्षी 545 पुरुष आणि 216 महिलांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जागृतीने भोपाळच्या मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले आहे. त्याचबरोबर 2015 IAS टॉपर टीना डाबीची धाकटी बहीण रिया डाबी हिने 15 वा रँक मिळवला आहे. टीना डाबी अलीकडेच तिचा आयएएस पती अतहर खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आली होती.
150 विद्यार्थी राखीव
सर्वसाधारण प्रवर्गातून 263, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून 86, मागास प्रवर्गातून 229, अनुसूचित जातीतील 122, अनुसूचित जमातीतील 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यासह, 761 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. याशिवाय 150 उमेदवारांना राखीव ठेवण्यात आले आहे.
एकूण पद 836 त्यापैकी 180 IAS
या वर्षी एकूण 836 पदांची भरती होणार आहे. यामध्ये 180 IAS, 36 IFS, 200 IPS, केंद्रीय सेवा गट A च्या 302 आणि गट B च्या 118 पदांचा समावेश आहे.
हे आहेत सिव्हील सर्विस 2020 चे टॉप 101- शुभम कुमार
2-जागृती अवस्थी
3-अंकिता जैन
4-यश जालूका
5-ममता यादव
6-मीरा के
7-प्रवीण कुमार
8-जीवानी कार्तिक नागजीभाई
9-अपला मिश्रा
10-सत्यम गांधी