Vaccination
Vaccination

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणांमध्ये लसीकरण वेगाने व्हावे यासाठी २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २१ जूनपासून देशभर लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. मुंबई महापालिकेने यासाठी मेगाप्लान तयार केला आहे. यामध्ये आठवड्यातील तीन दिवस वॉक इन लसीकरणासाठी राखीव ठेवले आहेत.

  मुंबई – देशभरात उध्या २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटांचे वॉक-इन लसीकरण केले जाणार आहे. मुंबई महापालिका त्यासाठी सज्ज असून लसीकरणासाठी नियोजन केले आहे. मुंबईत आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस वॉक-इन लसीकरण केले जाईल. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी नोंदणी करूनच लस दिली जाणार आहे. फेरीवाले, रिक्षाचालक यांसारख्या सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा विचार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणांमध्ये लसीकरण वेगाने व्हावे यासाठी २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २१ जूनपासून देशभर लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. मुंबई महापालिकेने यासाठी मेगाप्लान तयार केला आहे. यामध्ये आठवड्यातील तीन दिवस वॉक इन लसीकरणासाठी राखीव ठेवले आहेत.

  या दिवशी १०० टक्के वॉक-इन लसीकरण करण्याचा प्रयत्न असणार आहे. शिवाय फेरीवाले, रिक्षाचालक यांसारख्या सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तर या दिवशी काही अंशी वॉक-इन स्वरुपातही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या नियोजनामध्ये गरजेनुसार आणि वेळेनुसार सुधारणा केल्या जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

  १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठीही काही ठराविक वयोगटांचे टप्पे केले जातील. ३० ते ४४ किंवा २५ ते ४४ असे वयोगटाचे टप्पे करुन लसीकरण मोहीम राबवण्याचे नियोजन पालिकेचे आहे. या वयोगटातील व्यक्तींना वॉक-इन लसीकरणात प्राधान्य दिले जाणार आहे.

  लसीकरण मोहिमेसाठी होणाऱ्या लसीकरण मोहीमेसाठी केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला ८ लाख ७० हजारांहून अधिक लसींचे डोस मिळण्याचे अपेक्षित आहे. गेल्या महिन्यात ४ लाख आणि त्यापूर्वीच्या महिन्यात ८ लाख ७० हजार लसीचे डोस मुंबई महापालिकेला मिळाले होते. मात्र आता १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण केले जाणार असल्याने पुरेसा लससाठा केंद्राकडून उपलब्ध होईल, अशी अपेक्षा महापालिकेला आहे. त्यामुळे लसीअभावी अधूनमधून ब्रेक लागलेल्या लसीकरणाला आता वेग येणार असल्याचे सांगण्यात आले.

  सोसायट्यांच्या जवळपास लसीकरणासाठी प्रयत्न –

  घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत सध्या विचार नाही. मात्र ज्याप्रमाणे आरोग्य शिबिरे घेतली जातात, त्याप्रमाणे सोसायट्यांपासून पाच किमी अंतरातील सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिरे झाली पाहिजे. सरकारकडून पुरेसा लस मिळाली, तर महापालिका अशा स्वरूपातही लसीकरण करण्याचे नियोजन करू शकेल, अशी माहिती महापौर पेडणेेेकर यांनी दििली.