
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पुढील भाग म्हणून मुंबईत उद्या १६ मार्च पासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे(Vaccination of children in the age group of 12 to 14 years in Mumbai from today; Proper preparation of BMC).
मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पुढील भाग म्हणून मुंबईत उद्या १६ मार्च पासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे(Vaccination Of Children in the age group of 12 to 14 years in Mumbai from today; Proper preparation of BMC).
मुंबईतील १२ केंद्रांवर २ दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी १२ वाजेपासून हे लसीकरण सुरु होणार आहे. १२ लसीकरण केंद्रांचा अभ्यास, अडचणी आणि प्रतिसाद पाहून आरोग्य सुविधांसह इतर बाबींचा विचार करुन त्यानंतर महानगरपालिकेच्या व शासनाच्या सर्वंच केंद्रांवर १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहीमेत आधी प्राधान्य गट, त्यानंतर येत्या १ मे पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे आणि ३ जानेवारी पासून १५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
प्रायोगिक १२ लसीकरण केंद्रांच्या अभ्यासानंतर इतर सर्व केंद्रांवर १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे आदींचेही सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांची त्या-त्या भागातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष करण्यात येणार आहे.
यामध्ये १ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० पूर्वी जन्मललेले लाभार्थी पात्र असतील. १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना कॉर्बेवॅक्स ही लस हातावर स्नायूमध्ये देण्यात येणार आहे. सदर लसीच्या २८ दिवसाच्या अंतरावर दोन मात्रा देण्यात येणार आहे.
कोविन प्रणाली होणार अद्ययावत
केंद्र शासनामार्फत कोविन प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरु असल्यामुळे १२ वर्ष पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांची देखील लसीकरणासाठी नोंदणी होऊ शकते, परंतु पालकांनी आपल्या १२ वर्ष पूर्ण झालेल्याच पाल्यास लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. पालिकेच्या सर्व उपनगरीय रुग्णालयात तसेच जम्बो सेंटरमध्ये हे लसीकरण केले जाईल.