मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, २१ सप्टेंबरला ७३ निवडक केंद्रांवर होणार लसीकरण

मुंबई महानगरपालिका(BMC) क्षेत्रातील ३१६ पैकी ७३ निवडक महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर (Vaccination Centers) २१ सप्टेंबरला लसीकरणाची तरतूद करण्यात आली. या ७३ लसीकरण केंद्रांची यादी महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली आहे.

    मुंबई : कोरोना (Corona) प्रतिबंध लसीकरण(Vaccination) मोहिमेतंर्गत मर्यादीत प्रमाणात लससाठा उपलब्ध असल्यामुळे मुंबई महानगरपालिका(BMC) क्षेत्रातील ३१६ पैकी ७३ निवडक महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर (Vaccination Centers) २१ सप्टेंबरला लसीकरणाची तरतूद करण्यात आली. या ७३ लसीकरण केंद्रांची यादी महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली आहे.

    दरम्यान, आज रात्री उशिरापर्यंत महानगरपालिका प्रशासनाला कोविड लससाठा उपलब्ध होणार आहे. या साठयाचे वितरण उद्या २१ सप्टेंबर रोजी दिवसभरात विविध शासकीय व महानगरपालिका केंद्रांना करण्यात येईल. त्यामुळे बुधवारी २२ सप्टेंबर २०२१ पासून सर्व ३१६ शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु होईल. लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्याअनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.