पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हे खऱ्या अर्थाने लोकप्रिय नेते होते. उत्तम संसदपटू आणि माणुसकी काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. 'हिंदू अब मार नही खाएगा', असे त्यांनी ठणकावून सांगितले. पण त्याचा अर्थ 'कोई और मार खाएगा', असा नव्हता. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, हे सूत्र त्यांनी कसोशीने पाळले. धर्मांध न होतादेखील हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे त्यांनी दाखवून दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

    आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जंयती आहे. यानिमित्ताने देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृर्तींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. देशाचे नेतृत्व कसे असले पाहिजे हे अटल बिहारी वाजपेयींकडे पाहून कळते. धर्माधता आणि जातीयता दूर ठेवून राजकारण करता येते हा आदर्श अटल बिहारी वाजपेयी यांनी देशासमोर आणि सर्व राजकीय पक्षासमोर ठेवला, असे संजय राऊत यांनी म्हटले.

    पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हे खऱ्या अर्थाने लोकप्रिय नेते होते. उत्तम संसदपटू आणि माणुसकी काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. ‘हिंदू अब मार नही खाएगा’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. पण त्याचा अर्थ ‘कोई और मार खाएगा’, असा नव्हता. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, हे सूत्र त्यांनी कसोशीने पाळले. धर्मांध न होतादेखील हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे त्यांनी दाखवून दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

    “पंडित नेहरुंनंतर अटल बिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्षांचे ते लोकप्रिय नेते होते. ते आपल्या विचारधारेसोबत एकनिष्ठ होते. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य आम्हाला जवळून पाहता आले. देशाचे नेतृत्व कसे असावे हा परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून मिळाला. हिंदुत्वाच्या विचारधारेसोबत कधीही तडजोड न करता हा देश सगळ्यांचा आणि देशातील एकात्मतेवर भर देऊन राजकारण करणारे अटलबिहारी वाजयेपयी होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि शिवसेनेच्या झालेल्या युतीला वाजपेयी यांचे फार मोठे योगदान होते. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. पंतप्रधान असताना ते अनेक विषयांवरु बाळासाहेबांसोबत चर्चा करत होते. आज जो भारतीय जनता पक्ष दिसत आहे त्याचे स्तंभ आहेत अडणवाणी आणि वाजपेयी. वाजयपेयींचे स्मरण आम्हाला कायम होत असते,” असे संजय राऊत म्हणाले.