Video of a young man traveling without a ticket storms viral

    मुंबई : लोकल प्रवासास बंदी असल्याने होत असलेल्या त्रासाबद्दल या तरुणाने रेल्वेच्या कार्यालयातून खंत व्यक्त केली असून, हाच व्हीडिओ ट्वीट करत मनसेने ठाकरे सरकारला सवाल केला आहे. अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वगळता इतरांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र, असे असतानाही या तरुणाने लोकलमधून प्रवास केला. परेल स्थानकावर टीसीने त्याला पकडले. त्यानंतर त्याने व्हीडिओ करून लोकल प्रवासाच्या बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली.

    या व्हिडिओच्या माध्यमातुन या तरुणाने सरकारचेही लक्ष वेधले. या तरुणाचा व्हीडिओ मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर पोस्ट केला करीत बहिरे सरकार ऐकेल का?, असा सवाल ठाकरे सरकारला केला आहे.