Vihang Saranaik has been admitted to the ED office

मागील महिन्यात ईडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह त्यांच्या मुलांच्या घरी आणि कार्यालयांवर छापा टाकला होता. या छाप्याच्या वेळी प्रताप सरनाईक परदेशात होते. मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेऊन सलग ६ तास चौकशी केली होती.

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक (Vihang Saranaik) ईडीच्या मुंबईतील कार्यालयात ( ED office) दाखल झाले आहेत. विहंग सरनाईक यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीने ६ वेळा समन्स बजावले होते. परंतु ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. मागील महिन्यात ईडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह त्यांच्या मुलांच्या घरी आणि कार्यालयांवर छापा टाकला होता. या छाप्याच्या वेळी प्रताप सरनाईक परदेशात होते. मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेऊन सलग ६ तास चौकशी केली होती.

विहंग सरनाईक यांना चौकशीनंतर पुन्हा ईडीने समन्स धाडले होते. परंतु ते काही कारणास्तव चौकशीस हजर राहिले नाही. मात्र आता ईडीने ६ वेळा समन्स पाठवल्यानंतर विहंग सरनाईक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. टॉप्स ग्रुपमधील पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने प्तताप सरनाईक यांच्या घरासह १० मालमत्तांवर छापा टाकला होता.