ट्रान्स हार्बर लिंकचे काम करणाऱ्या कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन, मनसेच्या वाहतूक सेनेचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जडअवजड वाहतूक विभागाचे प्रमुख प्रदीप वाघमारे म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाच्या पॅकेज १ चे संपुर्ण काम L&T आणि IHL या कंपन्यांना देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी संबंधित कंपन्यांना ७६३७ कोटींचे कंत्राट मंजूर झाले आहे.

    ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम करणाऱ्या L&T आणि IHL या कंपन्यांकडून वाहनांमध्ये भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करण्यात येत असून त्यामुळे परिवहन विभागाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. या कंपन्यांनी कोट्यवधीचा कर बुडवला असून, तो कर भरला नाही तर तीव्र आंदोळन करण्यात येईल.’ असा आरोप करत आंदोलनाचा इशारा मनसे वाहतूक सेनेने दिला आहे.

    दरम्यान, मनसे वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाने या कंपनीच्या व्यवस्थापनासोबत भेट घेतली. तसेच ते महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा कर बुडवत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जडअवजड वाहतूक विभागाचे प्रमुख प्रदीप वाघमारे म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाच्या पॅकेज १ चे संपुर्ण काम L&T आणि IHL या कंपन्यांना देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी संबंधित कंपन्यांना ७६३७ कोटींचे कंत्राट मंजूर झाले आहे.

    या प्रकल्पच्या कामाच्या वाहतुकीसाठी परिवहन विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक होते. पण, आजपर्यंत परवानगी घेतलेली नाही. प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याकरिता परदेशातून स्टील गर्डर आयात केले जाते. महाराष्ट्र शासनाच्या MMRDA आणि परिवहन मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र, दोन्ही विभागाचे आयुक्त या संपूर्ण प्रकरणाकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप प्रदीप वाघमारे यांनी केला आहे.