Incoming NCP continues; BJP office bearers from Navi Mumbai join NCP

राज्यात आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडली. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून त्यात प्रामुख्याने विजय वडेट्टीवार व सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश आहे. दरम्यान, राज्यात सध्या सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. आज याचा काहीसा परिणाम सुरूवातीला मतदान प्रक्रियेवर सुद्धा दिसून आला. मात्र बीड, उस्मानाबाद, बुलढाणा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले(Violence erupts in Nagar Panchayat elections! BJP-NCP workers clash with each other; Hurricane Radha in Beed, Osmanabad, Buldhana and Chandrapur).

  मुंबई : राज्यात आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडली. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असून त्यात प्रामुख्याने विजय वडेट्टीवार व सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश आहे. दरम्यान, राज्यात सध्या सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. आज याचा काहीसा परिणाम सुरूवातीला मतदान प्रक्रियेवर सुद्धा दिसून आला. मात्र बीड, उस्मानाबाद, बुलढाणा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले(Violence erupts in Nagar Panchayat elections! BJP-NCP workers clash with each other; Hurricane Radha in Beed, Osmanabad, Buldhana and Chandrapur).

  पोलिसांचा लाठीमार

  बीड आणि उस्मानाबादेत नगरपंचायत निवडणुकीला गालबोट बसला. मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने या दोन्ही जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.उस्मानाबादेत तर तीन मतदारसंघात पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर या तिन्ही मतदारसंघात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

  दोन गटाच्या हाणामारी, चार जण गंभीर जखमी

  बुलढाणा जिल्ह्यातील जलंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असताना दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जलंब येथे आज सकाळपासून ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी मतदान सुरू होते. त्यानंतर दोन गटात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर अचानक एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केल्याने तुंबळ हाणामारी झाली.

  भाजपा मंत्र्याच्या कारवर दगडफेक

  चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात भाजपाच्या जिल्हा महामंत्र्याचा कारवर दगडफेक करण्यात आली आहे. यानंतर महामंत्री डाहूलेनी यांनी पोलिसांत तक्रार केली असून काँग्रेसचे विजय बावणे, नितीन बावणे पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.