सीएसएमटी फलाटावर ठेवलेल्या कोचजवळील सेल्फी पॉईंटवर फोटो क्लीक करून प्रवाशांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी एका प्रवाशाने कोचसारखा दिसणारा केकही कापला. रेल्वमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, मुंबई-पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेसमध्ये लावलेल्या पारदर्शक व मोठ्या खिडक्या असणारे विस्टाडोम कोचमुळे प्रवासाचा आनंद द्विगुणीत झाला. नैसर्गिक सौंदर्य असणाऱ्या या मार्गावर प्रवास करणे प्रवाशांसाठी आनंददायी असते. प्रवाशांना जागतिक स्तरावरील सुविधा देण्यासाठी रेल्वे सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत गोयल यांनी व्यक्त केले.
मुंबई : पुण्यातून मुंबईला नोकरीनिमित्त येणाऱ्यांची संख्या जास्त असून आता मुंबई-पुणे प्रवास सोपा होणार आहे. मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस स्पेशल ट्रेन शनिवारी एलएचबी रेक आणि विस्टाडोम कोचसह प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाली. या मार्गावर पहिल्यांदाच विस्टाडोम कोच बसवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नैसर्गिक सौंदर्य आणि डोंगरदऱ्यांचा आस्वाद घेता येणार आहे. पहिल्याच ट्रेनला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. विस्टाडोम कोचच्या सर्व ४४ सीट्स बुक होत्या.
सीएसएमटी फलाटावर ठेवलेल्या कोचजवळील सेल्फी पॉईंटवर फोटो क्लीक करून प्रवाशांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी एका प्रवाशाने कोचसारखा दिसणारा केकही कापला. रेल्वमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, मुंबई-पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेसमध्ये लावलेल्या पारदर्शक व मोठ्या खिडक्या असणारे विस्टाडोम कोचमुळे प्रवासाचा आनंद द्विगुणीत झाला. नैसर्गिक सौंदर्य असणाऱ्या या मार्गावर प्रवास करणे प्रवाशांसाठी आनंददायी असते. प्रवाशांना जागतिक स्तरावरील सुविधा देण्यासाठी रेल्वे सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत गोयल यांनी व्यक्त केले.
आपल्या पत्नी आणि मुलासह प्रवास करणाऱ्या उमेश मिश्रा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे विस्टाडोक कोच सुरू केल्याबद्दल आभार मानले. अशी कोच केवळ परदेशातच पहावयास मिळते, परंतु, या कोचमधून आता मुंबई, पुणेकरांनाही प्रवास करता येणार आहे. मोठ्या खिडक्या आणि चोहूबाजूने फिरणाऱ्या सीटमुळे मुलांनीही आपला आनंद साजरा केला.
मुंबई आणि पुण्यादरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांिगतले की, घाटात या ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव सुखद होता. प्रवाशांनी माथेरान टेकडी, सोनगिरी टेकडी, उल्हास नदी, उल्हास घाट, खंडाळा आणि लोनावळा, दक्षिण पूर्व घट मार्गावरील धबधबे, भूयारी मार्ग आदींचा प्रवाशांनी आस्वाद घेतला.
मुंबई-पुणे रेलमार्ग पर, विशेष डेक्कन एक्सप्रेस मे लगे पारदर्शी व बड़ी खिड़कियों वाले विस्टाडोम कोच, सफर का आनंद कई गुना बढ़ा रहे हैं।
प्राकृतिक सुंदरता वाले इस मार्ग पर सफर कर रहे यात्री अपने अनुभव साझा कर रहे हैं। यात्रियों के विश्वस्तरीय अनुभव के लिये रेलवे निरंतर प्रयासरत है। pic.twitter.com/zxj3WF4Urt
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 26, 2021