Voter Mobile App The facility of name registration in the voter list is also available

राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल(Voter Mobile App The facility of name registration in the voter list is also available) अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

    मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल(Voter Mobile App The facility of name registration in the voter list is also available) अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

    ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित

    मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां संदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व निवडणूक यंत्रणेला सुविधा व माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध सुविधांसह मतदारांना मतदार यादीतील आपले नाव शोधता येते. त्यात आता मतदार नोंदणीच्या सुविधेचीही भर घालण्यात आली आहे. त्यातून भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी संकेतस्थळाच्या लिंकद्वारे मतदार नोंदणी होईल. मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतही दुरूस्ती करता येईल.

    ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध

    भारत निवडणूक आयोगातर्फे ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने१ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आहे. या कार्यक्रमानंतर ५ जानेवारी २०२२ रोजी विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याच मतदार याद्या २०२२ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांनी नावे नोंदवावित किंवा नावांत अथवा पत्त्यांत बदल असल्यास तोही आता करावा, असे आवाहन मदान यांनी केले.