shiv sena asks central government to stop use of loudspeakers on mosques vb

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आपली नाराजी व्यक्त करताना अनेक खुलासे केले आहेत. माझ्या घरावर धाड टाकून झडती घेतली आणि त्रास दिला गेला असा आरोप शंकरराव गडाख यांनी केला आहे. मागच्या 5 वर्षांपूर्वी मी आमदार नसताना माला शेतकरी आंदोलनाची नोटीस धाडली. या प्रकरणात माझ्या घरावर धाड टाकली. कोर्टाची नोटीस माझ्यापर्यंत आली नाही. शेवटची तारीख असल्याने कोर्टात हजर झालो नाही म्हणून LCB च्या पोलीस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली आणि झडती घेतली असा दावा गडाख यांनी केला आहे.

    मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या एका मंत्र्याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. यावेळी या मंत्र्यांने तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

    जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आपली नाराजी व्यक्त करताना अनेक खुलासे केले आहेत. माझ्या घरावर धाड टाकून झडती घेतली आणि त्रास दिला गेला असा आरोप शंकरराव गडाख यांनी केला आहे. मागच्या 5 वर्षांपूर्वी मी आमदार नसताना माला शेतकरी आंदोलनाची नोटीस धाडली. या प्रकरणात माझ्या घरावर धाड टाकली. कोर्टाची नोटीस माझ्यापर्यंत आली नाही. शेवटची तारीख असल्याने कोर्टात हजर झालो नाही म्हणून LCB च्या पोलीस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली आणि झडती घेतली असा दावा गडाख यांनी केला आहे.

    कशीही करुन फक्त सत्ता मिळवणे आणि सत्ता राखणे यासाठी होणारे दुर्दैवी प्रकार असून ते थांबले पाहिजेत. शिवसेनेची सत्ता असताना गृह खाते कोणाकडे होते? खरी सत्ता कोण चालवत होते? असे म्हणत या खोलात जाणार नाही असे म्हणत त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

    दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहीले आहे. ‘महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे शिवसेना पक्ष फोडत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घ्यावे. यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या तुमच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल असे सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे.