CCTV footage of explosives found near Ambani's house in police hands; A man wearing a PPE kit was seen near a Scorpio car

पीपीई किट घातलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे. त्यामुळे आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करुन पुन्हा तिथेच, तसंच चालवणार चालायला लावणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. CCTV फुटेजमधील PPE किट घातलेल्या व्यक्तींच्या हालचाली आणि त्यांच्या हालचालीवरुन ती व्यक्ती सचिन वाझेच होती का, याचा शोध एनआयएचे अधिकारी घेणार आहेत. यासाठी ‘फॉरेन्सिक पोडियाट्री' या परदेशी तपास पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीत एखाद्या व्यक्तीचे पाय, पायाचे ठसे, चालण्याची पद्धत याचं निरीक्षण करुन आरोपीची ओळख पटवली जाते.

    मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी अज्ञात स्कॉर्पिओ आढळून आली, तसेच येथे स्फोटकासाठी वापरण्यात येणाऱ्या जेलिटन काड्याही सापडल्याने खळबळ उडाली होती. येथील CCTV फुटेज पोलिसांनी तपासले आहे. या फुटेजमध्ये स्कॉर्पिओ कारजवळ PPE किट घातलेली व्यक्ती दिसत आहे. ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

    मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके सापडली होती, ती चोरीची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडल्यानंतर सचिन वाझे या प्रकरणात अडकले. रोतोरात त्यांना त्यांना अटक करण्यात आली. एनआयएचे अधिकारी आता वेगाने या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत. अंबानींच्या घराजवळच्या 49 सेकंदाच्या CCTV फुटेजमध्ये मोठा पुरावा तपास अधिकाऱ्यांना सापडला आहे.

    सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक स्कॉर्पिओ आणि एक इनोव्हा कार दिसून आली होती. हीच इनोव्हा कार स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओचा पाठलाग करत होती. याच स्कॉर्पिओ कारजवळ PPE किट घातलेली व्यक्ती दिसत आहे. ही इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती.

    पीपीई किट घातलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे. त्यामुळे आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करुन पुन्हा तिथेच, तसंच चालवणार चालायला लावणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. CCTV फुटेजमधील PPE किट घातलेल्या व्यक्तींच्या हालचाली आणि त्यांच्या हालचालीवरुन ती व्यक्ती सचिन वाझेच होती का, याचा शोध एनआयएचे अधिकारी घेणार आहेत. यासाठी ‘फॉरेन्सिक पोडियाट्री’ या परदेशी तपास पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीत एखाद्या व्यक्तीचे पाय, पायाचे ठसे, चालण्याची पद्धत याचं निरीक्षण करुन आरोपीची ओळख पटवली जाते.